श्रीमती द्रौपदी बाई रामचंद्र शेट कन्या शाळेत अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी श्रीमती द्रौपदी बाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. युवा कल्याण प्रतिष्ठान महापुरुषांचा विचारांचा प्रसार आणि प्रचार अभियानांतर्गत अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा सूर्यवंशी मॅडम होत्या व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे नूतन मराठा संस्थेचे पष्टाने येथील माध्यमिक शिक्षक श्री. दयाराम पाटील सर वक्ते म्हणून लाभले त्यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन करून अण्णाभाऊ साठे यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या. तसेच सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कसे खरे उतरतात यावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊंच्या साहित्याचा केंद्रबिंदू जगण्यासाठी लढणारा माणूस आहे. असे प्रमुख वक्त्यांनी आपल्या व्याख्यानात नमूद केले. कार्यक्रमा प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री साखरलाल माळी सर व श्री कैलास बाविस्कर सर उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संजीवनी देवरे यांनी केले व सरते शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती योगेश्री पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी व शिक्षकेतर बंधूंनी मोलाचे सहकार्य केले.


