बालाजी विद्यालय गांधली पिळोदा येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

0

अमळनेर एक्सप्रेस न्युज.
अमळनेर प्रतिनिधी.

बालाजी विद्यालय गांधली पिळोदा माध्यमिक विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील काटे सर ,विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री एन वाय पाटील, एन एस निळे, व या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री डी ए पाटील सर यांनी लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रमुख वक्ते डीए पाटील सर यांचा सत्कार एन वाय पाटील सर यांनी केला. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते डीए पाटील सर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊंचे साहित्याचा केंद्रबिंदू जगण्यासाठी लढाई लढणारा माणूस होता .अण्णाभाऊ माणसाचे कैवार होते. कामगारांचे राज्य प्रस्थापित व्हावे असे अण्णाभाऊंना वारंवार वाटत होते. अण्णाभाऊ पुढे म्हणतात की ही पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या श्रमिकांच्या तळ हातावर तरलेली आहे हा विज्ञानवाद अण्णाभाऊ साठे सांगतात. अण्णाभाऊंचे साहित्य वास्तववादी साहित्य आहे. त्यांच्या साहित्यामध्ये शोषित पीडित वंचित स्त्रियांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी तरुणांमध्ये ज्योत पेटवण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून केलेले दिसते. असे विचार प्रमुख वक्त्यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी यांनी प्रयत्न केलेत सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका प्रियांका अहिरराव मॅडम यांनी केले. व कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!