*मारवड महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी
ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथील राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील यांनी भुषविले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इतिहास विभाग प्रमुख डॉ. दिलीप कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ.सतीश पारधी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. दिलीप कदम व
महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्हि. डी. पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिलीप कदम यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मवाळ वाद आणि जहाल वाद या दोन्ही मधला दुवा लोकमान्य टिळक होते. टिळक हे निर्विवादपणे 1885 ते 1920 या काळात महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे मान्यता पावलेले नेतृत्व होते. त्यांनीच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादाचा चतुसूत्रीच्या कार्यक्रमातून एक नव्या स्वरूपात सर्व समावेशक अशी स्वातंत्र्य चळवळ तयार केली आणि ही स्वातंत्र्य चळवळ एक मुखी आणि सर्वात लोकप्रिय केली. यामुळे सरळ सरळ स्वराज्याचा मार्ग सामान्यांपर्यंत स्पष्ट केला होता. अशी माहिती आपल्या मनोगतातून उपस्थितांना दिली. महापुरुषांच्या जीवनाचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावा असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनापासूनच महापुरुषांचा आदर्श घेत एक चांगला नागरिक होवून देशाची सेवा करावी असा संदेश आपल्या मनोगतातून उपस्थितांना दिला.
प्रथम वर्ष वर्गातील कु.दिपाली सोपान कोळी, अश्विनी जगदीश पाटील, मोनिका प्रदिप खैरणार या विद्यार्थिनीने लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे आभार डॉ. माधव वाघमारे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा. डॉ. देवदत्त पाटील,प्रा. विजय पाटील, प्रा.डॉ. पवन पाटील, प्रा. डॉ. संजय पाटील, प्रा.डॉ. संजय महाजन, श्री. जगदीश साळुंखे, डॉ.सचिन पाटील, श्री.सचिन साळुंखे, श्री. अतुल साळुंखे तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!