*साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम संपन्न*
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
*श्रमिकांसाठीचे योगदान, साहित्यिक क्रांती आणि स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष प्रेरणा देणारे आहेत* :- शिक्षिका निता पाटील
प्रतिनिधी:-
साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साळवे येथे आज स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, विचारवंत, साहित्यिक, कवी, प्रबोधनकार व समाज सुधारक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व स्वातंत्र्य चळवळीतील जहाल नेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त वकृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका निता पाटील ह्या होत्या. अण्णाभाऊंचा संघर्ष, श्रमिकांसाठीचे योगदान आणि साहित्यिक क्रांती आजही प्रत्येक शेतकरी, कष्टकरी, कामगार यांना प्रेरणा देतात. तर जहाल नेते लोकमान्य टिळक यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? व स्वातंत्र्य माझ्या जन्मसिद्ध अधिकार आहे. असे सांगून ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडले. अशा या महान नेत्यांचे आदर्श आपण घेतले पाहिजे असे सांगितले.
विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्रावर सुंदर असे ओघवत्या भाषेत अभ्यासपूर्ण भाषणे केली. त्यातून लहान गटात प्रथम क्रमांक अरहान देशमुख व पियुष सदावर्ते. द्वितीय क्रमांक वैभवी बाविस्कर, तृतीय क्रमांक दिवेश नारखेडे. यांना देण्यात आला. आणि मोठ्या गटात प्रथम क्रमांक पूर्वा विनोद पाटील (दहावी ब), द्वितीय क्रमांक ईशांत विजय ढाके, (नववी ब) व तृतीय क्रमांक तोशिका आशिष नारखेडे, (आठवी ब) या विद्यार्थ्यांची निवड करून यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचे नियोजन व सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका रंजना नेहेते यांनी केले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक एस डी मोरे,ज्येष्ठ शिक्षक जी व्ही नारखेडे, व्ही के मोरे, ए वाय शिंगाने, एस पी तायडे, एस व्ही राठोड, डी जे पाटील, शिक्षिका प्रतिभा नेहेते, गुणवंती पाटील, वर्षा नेहेते, पौर्णिमा वारके व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री बी आर बोरोले यांनी केले.

