राजमाता अहिल्याबाई होळकरांचा अवमान करणाऱ्या वर अत्यंत कठोर कारवाई करावी.
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांची त्रि शताब्दी जयंती निमित्त सर्वत्र कार्यक्रम होत आहेत. राजमाता कुशल प्रशासक, जनकल्याणकारी व न्यायप्रिय म्हणून संपूर्ण जगाला माहित आहे. त्यांच्याविषयी सोशल मीडिया व फेसबुक वर अश्लील पोस्ट टाकून त्यांचे चारित्र्य हनन करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न ,सुनील गोपाळला उभे नावाचा इसम करीत आहे .या अपमानास्पद शब्दप्रयोगामुळे जगातील कोट्यावधी स्री पुरुषांच्या भावना दुखावल्या आहेत या कृत्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे .कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर प्रकरणी तात्काळ दखल घेऊन दोषीवर अत्यंत कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन सकल धनगर समाज प्रतिष्ठानच्या वतीने अमळनेर प्रांत अधिकारी यांना देण्यात आले. निवेदनावर पुढील मान्यवरांच्या सह्या आहेत.
बन्सीलाल भागवत, एस सी तेले, अशोक पवार, संदीप घोरपडे, शेख रियाज भाई मौलाना, प्रदीप कनखरे ,गोपीचंद धनगर, मनोहर धनगर, विकास सूर्यवंशी, अनिल धनगर, दिलीप ठाकरे ,दिलीप खांडेकर, सारव भागवत, प्रा सुभाष पाटील, हरचंद लांडगे, आर .पी. धनगर, कैलास ठाकरे, संजय ठाकरे, जितेंद्र धनगर, दिनेश धनगर, रमेश धनगर ,नामदेव ठाकरे, तुकाराम धनगर , परशुराम ठाकरे.

