*जि प केंद्रशाळा सावखेडा येथे शालेय दप्तर वाटप*
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
सावखेडा ता.अमळनेर येथील जि प केंद्रशाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी वाटप कार्यक्रम लतिका चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यातर्फे घेण्यात आला.
मुख्याध्यापिका सुषमा तायडे यांनी प्रास्ताविक केले. लतिका फाउंडेशन लतिका चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शत्रुघ्न वानखेडे, सचिव आनंद वानखेडे आणि लतिका वानखेडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र अहिरे, ग्रा.प.सदस्य रविंद्रनाथ कदम, अनिल नेरकर, तसेच विश्वास भिल, गिरधर भिल, शाहरुख खाटीक, योगेश तिरमले, सोनाली भिल, विलास कदम, संजय कदम हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका वैशाली बोरसे, प्रमिला मोरे, रोशनी महाले यांच्यासह वंदना कदम, उदय कदम यांनी सहकार्य केले.

