साळवे इंग्रजी विद्यालयात पालक शिक्षक व माता पालक संघाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

0

अमळनेर एक्सप्रेस न्युज 

“*उत्तम सुसंस्कारी संतती हीच मोठी संपत्ती आहे*” — मुख्याध्यापक एस डी मोरे

प्रतिनिधी:-

साळवे येथील अमृत महोत्सवी संस्था साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि प पू साने गुरुजी प्राथमिक सेमी विद्यालय, साळवे येथे पालक शिक्षक संघाची व माता पालक शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन डॉ. शशिकांत नारखेडे हे होते. यावेळी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे व खजिनदार डॉक्टर चंद्रकांत नारखेडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक पालक शिक्षक संघाचे सचिव जी व्ही नारखेडे यांनी सभेचे प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक एस डी मोरे यांनी सन २०२४-२५ मध्ये दहावी व बारावी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. विद्यालयाचा दहावीचा निकाल ९४.८०% व बारावीचा निकाल ७८% लागला असून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. पालकांनी आपल्या पाल्याच्या गुणवत्तेकडे, शिक्षणाकडे, आरोग्याकडे जागृक पालक म्हणून लक्ष ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते असे सांगितले. शाळेतील विविध शालेय उपक्रमांची माहिती सांगितली. सांस्कृतिक कार्यक्रम, सहल, प्रबोधनात्मक नाट्यछटा, श्रमदान व विविध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या गोष्टींना चालना देण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. पालकांनी ही विविध विषयांमध्ये चर्चा करून सहभाग घेतला. परीक्षा, श्रमदान, शारीरिक व बौद्धिक विकास यासाठी आम्ही आमच्या परीने मदत करू असे आश्वासन दिले.
ज्येष्ठ शिक्षक व्ही के मोरे यांनी फिरती विज्ञान प्रयोगशाळा व इतर विषयांवर सविस्तर माहिती दिली. पालकांनी सक्रिय सहभाग घेऊन सगळे विषय शांततेत ऐकून घेतले व विद्यार्थ्यांना पुढील गोष्टींमध्ये चालना मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका रंजना नेहेते यांनी गोड शब्दात मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!