माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
सामाजिक न्यायचा योद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…डी एम पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस अमळनेर तालुका अध्यक्ष शरद चंद्र पवार अमळनेर Express news अमळनेर प्रतिनिधी
दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी माध्यमिक विद्यालय रणाईचे तालुका अमळनेर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत वक्ता म्हणून सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक तथा अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष डी एम पाटील सर उपस्थित होते याप्रसंगी संस्थेचे समन्वयक श्री शिंदे सर, मुख्याध्यापिका रीना पाटील मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ठाकरे सर व आभार प्रदर्शन श्री कापडणे सर यांनी केले🙏

