मैत्री दिन एकमेकातील स्नेह वाढविणारा दिवस!!!

0
  • अमळनेर Express news
  • अमळनेर प्रतिनिधी
  • ‌ ‌‌ मानवाची निर्मिती चिपांझी नावाच्या आफ्रिकेतील माकड या प्राण्यापासून झाली असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे. डार्विन नावाचे शास्त्रज्ञ यांनी या प्रजातीमध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलाची फलश्रुती म्हणजे मानव होय. डार्विनने लावलेल्या शोधामुळे मानवाची निर्मिती देवाने केलेली आहे हा भ्रम मिटला. आज विज्ञान डार्विनच्या सिद्धांताला प्रमाण मानून चालत आहे. मानवाला प्रगत होत असताना एकत्रित राहण्याची कल्पना सुचली. मानवाचा मेंदू विकसित होत असताना त्याला समाजाची गरज भासू लागली. समाज म्हटला की त्यामध्ये प्रेम, आपुलकी ,जिव्हाळा ,स्नेह या गोष्टी आल्या. मानवाच्या या वाढलेल्या गरजा मधून मैत्री ही संकल्पना रुढ झाली. पूर्वी मैत्री दिन जरी साजरा होत नसेल तरी आपापसात चांगल्या प्रकारची मैत्री भावना वाढीस लागलेली दिसते. मित्रासाठी जीव देणाऱ्या अनेक शूरवीरांचे उदाहरण आहेत. मैत्री ही मनातील भावना व्यक्त करण्याचे विचारपीठ आहे. मैत्री मानवाला दुःखापासून वाचवते. संकट सहन करण्याची शक्ती मैत्रीत असते. हजारो संकटे येऊ द्या त्यावेळेस सकारात्मक विचाराचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला जगातली कोणतीच संकटे हरवू शकत नाही.
    ‌‌ जागतिक मैत्री दिन 30 जुलै 1958 हा मानला जातो. जागतिक मैत्री दिन हा ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी येणाऱ्या दिवसाला साजरा केला जातो. यंदा हा दिवस तीन ऑगस्ट 2025 रोजी आलेला आहे. जगामध्ये मैत्री दिन सुरू करण्याचा पहिला प्रयत्न चॉईस हॉल ह्या हॉलमार्क ह्या कंपनीच्या संस्थापकाने 1930 ला केला. हॉलमार्क ही कंपनी ग्रीटिंग्स बनवणारी कंपनी होती. त्यांनी मैत्री दिनावर कार्ड्स बनविले परंतु लोकांना पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर डॉ. रॅमन ‌ आर्टेमियो ब्राचो याने 1958 रोजी जागतिक मैत्री दिन साजरा केला. त्यानंतर संयुक्त राष्ट्र सभेने 30 जुलै हा जागतिक दिन घोषित केला. भारत, बांगलादेश, अमेरिका या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा मैत्री दिन साजरा करण्यात येतो.
    ‌‌ ‌ भारतात तसेच विदेशातही अनेक प्राचीन लोकांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. सॉक्रेटिस व प्लेटो, प्लेटो व ॲरिस्टॉटल , सिद्धार्थ गौतम बुद्ध व आनंद… काही प्राचीन ग्रंथांमध्ये मैत्रीचे उल्लेख आढळतात. दशरथ पुत्र राम व सुग्रीव, बिबीक्षण व राम, श्रीकृष्ण व सुदामा, कर्ण व सुयोधन होत. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी अनेक जातीतील लोक मित्र म्हणून एकत्र केलेले होते. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, इब्राहिम, बहिर्जी नाईक यासारख्या अनेक मित्रांनी शिवाजी महाराजांना युद्धामध्ये यश मिळवून दिले. शिवाजी महाराजांचे मित्र शिवाजी महाराजांसाठी जीव देणारे होते त्यामुळेच स्वराज्य उभे करताना. जीवा महाले या मित्रांमुळे शिवाजी महाराजांचे प्राण वाचले होते. त्यावरूनच एक म्हण तयार झाली .”होता जीवा म्हणून वाचला शिवा” . या सर्व मित्रांनी एकत्र येऊन स्वराज्याची संकल्पना पूर्ण करून दाखवली. संताजी व धनाजी हे दोन सरदार मोगलांच्या सैन्याला सळो की पळो करून सोडत असत. भारतात वैचारिक मैत्री सुद्धा प्रसिद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले व शाहू महाराज होय.अण्णाभाऊ साठे, शेख व गव्हाणकर यांच्या मैत्रीने अख्खा महाराष्ट्र जागृत करून संयुक्त महाराष्ट्र जिवंत ठेवला. वामनदादा कर्डक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ‌ यांच्या मैत्रिणी बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवली. मैत्री या विषयावर अनेक चित्रपट सुद्धा येऊन गेले. शोले या चित्रपटात दोन मित्रांची अतुट मैत्री दाखविली आहे. याराना या चित्रपटात दोन मित्रांची सांगड घातली आहे. निळू फुले व श्रीराम लागू यांचीही मैत्री कायम टिकली. पानसरे व दाभोळकर यांची मैत्री प्रसिद्ध आहे. मैत्री ही मानवतेला समृद्ध करणारी बाब आहे. मैत्रीने दुःख पचविण्याची ताकद मिळते. मैत्रीत दगा दिला जात नाही. दगा दिलेले मैत्री ही मैत्रीच्या व्याख्येत बसत नाही. मैत्रीला वयाचे बंधन नसते. मैत्री ही निर्मळ भावना आहे. एकमेकांसाठी जीव की प्राण आहे. मैत्री या अदृश्य धाग्याने बांधली जाते. आज निर्मळ मैत्रीचे उदाहरण बोटावर मोजणे इतके राहिले आहे. कारण त्यांना मैत्री या पवित्र नात्याची विण समजलेली नसते. एकदा एका मित्राची झोपडी जळून खाक होते. त्यावेळी झोपडी जळालेल्या मित्राने आपल्या मित्राला फोन केला की माझी झोपडी जळाली. त्याच्या मित्राने त्याला सांगितले की तू आहेस ना मग सर्व आहे. तू नसता आणि झोपडी असती तर मला माझा मित्र गमावल्याचे दुःख कायम राहिले असते. तू आहे म्हणजे सर्व काही आहे. झोपडी जळाली तू वाचला म्हणजे काहीच बिघडलेले नाही. मैत्री मानवाला मिळालेली अनमोल देणगी आहे. ह्या अशा मैत्रीला जपले पाहिजे. ज्या लोकांना मित्र कमी असतात. ते एकलकोंडे होतात. अनेक मित्र असलेला व्यक्ती जीवनामध्ये संकटांना सामोरे जातो. आज-काल आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. कारण ते लोक आपला विचार व्यक्त करता येईल असा मित्र जोडत नाही. आपल्या भावना मित्रांना सांगत नाही. त्यासाठी मित्र असणे खूप महत्त्वाचे आहे. मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

    पत्रकार
    एस.एच.भवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!