धनदाई महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र संपन्न.*

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर: “योग्य माहिती, नियोजनबद्ध प्रयत्न आणि सातत्य हे स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक आहे” असे प्रतिपादन युनिक अकॅडमीचे साधनव्यक्ती सुनिल देशमुख यांनी येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागातर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रात केले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. लीलाधर पाटील यांनी अलीकडे चतुर्थ श्रेणी कर्मचारी ते वर्ग एक अधिकारी अशा सर्व पदांसाठी स्पर्धा परीक्षा देणे आवश्यक असून आपल्याला यासाठी एक रोडमॅप मिळावा म्हणून हे सत्र असल्याचे सांगितले. यानंतर मुख्य मार्गदर्शक सुनिल देशमुख यांनी विविध प्रकारच्या परीक्षा, त्याची तयारी करता यावी म्हणून शासनातर्फे मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्त्या, अभ्यासक्रम, नियोजनाचे महत्त्व व अडचणींवर मात करीत यशासाठी प्रयत्न कसे करावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या यशाद्वारे आपल्याला देश व जनसेवेची संधी उपलब्ध होणार असून आपण यात नक्की यशस्वी होऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी महाविद्यालयाने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा स्वतंत्र कक्ष व त्याचबरोबर ग्रंथालयात विशेष सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. तर याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. राहुल इंगळे, डॉ. रमेश पावरा, डॉ. संगीता चंद्राकर, डॉ. महादेव तोंडे, प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रा. रविंद्र चौधरी, प्रा. मेघना भावसार, प्रा. भाविका सूर्यवंशी, प्रा. वर्षा शेवाळे, प्रा.राजश्री चव्हाण यासह अनेक विद्यार्थी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!