पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी नयन योगेश मनोरे याची तालुकास्तरीय वर्ष वयोगट 14 मध्ये कुस्ती स्पर्धेत विजय प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड*
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक 23-8-2025 रोजी क्रीडा संकुल येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शालेय स्तरावरील वयोगट 14 व 17 यामध्ये समाविष्ट करण्यात आले होते. तालुक्यातील शहर व ग्रामीण स्तरावरील हायस्कूल विभागाचे विद्यार्थी सामील झाले होते. 14 वर्षे वयोगटातील 40 किलो वजन प्रकारामध्ये पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी नयन योगेश मनोरे (इयत्ता सातवी) याने नामवंत कुस्तीपटू विद्यार्थ्याला नमवून या गटप्रकारात याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. याने आपल्या कार्यातून सर्वांना अचंबित करून शाळेच्या खेळाच्या ऐतिहासिक कार्यात मानाचा तुरा रोवला.
सदर विद्यार्थ्याला अनमोल मार्गदर्शन सहकार्य शाळेचे चेअरमन श्री प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापक जे. एस.देवरे क्रीडाशिक्षक प्रशिक्षक महेश माळी, विनायक सूर्यवंशी, पर्यवेक्षिका कु. एम.एस.बारी, प्रशांत वंजारी, व्ही.पी. बडवे, योगिषा महाजन व समस्त शिक्षकवृंदवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांची लाभले.

