स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे बैलपोळा उत्सव उत्साहात साजरा 🌾

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे आज बैलपोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्री-प्रायमरीच्या लहानग्या मुलांनी शेतकऱ्यांचा पोशाख करून आकर्षक सादरीकरण केले.

शाळेत खऱ्या शेतकऱ्यांसह बैलजोडीचे स्वागत करण्यात आले. बैलजोडीची पूजा-अर्चना करून नेवेद्य दाखविण्यात आला तसेच शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. विनोद अमृतकर यांनी शेतकरी व बैलजोडी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

अशा या सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलांना बैलपोळा सणाचे महत्त्व व शेतीसंस्कृतीची जपणूक समजावून देण्याचा उत्तम प्रयत्न करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!