व्हॉईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग) च्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी यांची पुनःश्च निवड जिल्हा सरचिटणीस पदी हेमंत वैद्य

0

अमळनेर   Express news

अमळनेर प्रतिनिधी

जळगाव : येथील व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे जळगाव जिल्हाध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी यांची तर जिल्हा सरचिटणीस पदी हेमंत वैद्य यांची सन २०२५-२६ या वर्षासाठी पुनःश्च नियुक्ती करण्यात आली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय मार्गदर्शक विनोद बोरे, साप्ताहिक विंग चे कार्याध्यक्ष अब्दुल कय्युम व प्रदेश सरचिटणीस वामन पाठक यांचे सहीने नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. मागील वर्षी व्हॉईस ऑफ मीडियाचे तत्कालीन उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी गुरुपौर्णिमेला संजय सूर्यवंशी यांच्या नावाची घोषणा केली होती. गणरायाच्या कृपेने पुन:श्च एकदा राज्य कार्यकारिणीने जिल्हाध्यक्ष पद बहाल केले आहे. उर्वरित जिल्हा व तालुका कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. राज्य कार्यकारिणी पदाधिकारी यांनी सर्व नवीन पदाधिकारी व्हॉईस ऑफ मीडिया च्या संघटन व विकास कामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील अशी अपेक्षा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांसाठी काम करणारी देशातील नंबर १ संघटना असून जगभरातील ५६ देशात ही संघटना काम करत आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी यांचा पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव व्हाईस ऑफ मीडिया च्या संघटन व विकास कामी महत्त्वाचा ठरणार आहे. सकाळ श्रमिक संघ, नाशिक या संघटनेचे ते सलग सात वर्ष बिनविरोध अध्यक्ष राहिले आहेत. या काळात त्यांनी कर्मचारी बांधवांच्या प्रश्नांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. याशिवाय अखिल भारतीय वृत्तपत्र कर्मचारी महासंघ, नवी दिल्ली या संघटनेतही काही काळ सदस्य होते. अमळनेेर येथे सन २०१५ पासून सलग तीन वेळा महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष होते. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
=====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!