प्राध्यापक अशोक पवार सर – एक चालते बोलते विद्यापीठ

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी                                                                                                            प्राध्यापक अशोक पवार सर – एक चालते बोलते विद्यापीठ                                                                                                            दिनांक 4 सप्टेंबर हा दिवस म्हणजे प्राध्यापक अशोक पवार सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे व अबालवृद्धांच्या तरुणाईच्या मनावर नेहमी अधिराज्य गाजविणारे प्राध्यापक अशोक पवार सर.  एक समाजसेवक सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र झटणारे तसेच युवा कल्याण प्रतिष्ठान मार्फत महापुरुषांचा विचारांचा प्रचार आणि प्रसार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी वक्ते तयार करून शाळा कॉलेजा ंपर्यंत तसेच खेड्यापाड्यांपर्यंत महापुरुषांचे विचार रुजावेत त्यांच्या कार्याची माहिती व्हावी व अशा महापुरुषांपासून प्रेरणा मिळावी यासाठी जनजागृती अभियान सतत सुरू आहे.तसेच माहितीचा अधिकार या विषयाचा सखोल अभ्यास असल्यामुळे गरजूंना या कायद्याची माहिती पोहोचवणे व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत राहणे असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक अशोक पवार सर. संविधान जागर अभियानाच्या माध्यमाने दररोज संविधानावर माहिती पाठवून संविधानाची जनजागृती व्हावी यासाठी सतत धडपड नुकतेच संविधान सांगूया संविधान पसरू या विषयावर एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून हे अभियान सतत महाराष्ट्रभर या शिबिराचे आयोजन होणार असून संविधान घराघरापर्यंत पोहोचवण्याचे एक राष्ट्रीय कार्य सरांच्या हातून होत असताना अत्यानंद होत आहे. महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी कला पथकाची निर्मिती करून गाव गाड्या वर जाऊन कलापथकाच्या माध्यमाने महापुरुषांच्या कार्याची जनजागृती करण्याचे काम देखील सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .असेच महान कार्य सरांच्या हातून होत राहो हीच सद इच् व. वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या आरोग्य निरोगी राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना आणि शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!