मारवड महाविद्यालयात “माहिती अधिकार दिवस” साजरा.—

0

अमळनेर Express news

मारवड, येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात आज दि. 29 सप्टेंबर रोजी मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या निर्देशानुसार महाविद्यालयातील
विद्यार्थी विकास विभागामार्फत “माहिती अधिकार दिवस” साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. डी. पाटील. तर प्रमुख व्याख्याते राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. माधव वाघमारे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी केले. तर सुत्रसंचलन प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले.

प्रमुख वक्ते प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी आपल्या व्याख्यानात माहिती अधिकार कायद्याच्या निर्मितीची गरज, प्रक्रिया आणि त्यासाठी झालेल्या विविध आंदोलनांची माहीती देत, या कायद्याच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तर अध्यक्षिय भाषणात उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. डी. पाटील यांनी माहिती अधिकार कायद्याच्या चौकटीत राहून भ्रष्टाचार, गैरव्यवहार व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कसे टाळता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. पवन पाटील यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!