दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती जिल्हा परिषद उर्दू शाळा उंबरखेड येथे मोठ्या उत्साहात साजरी

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी                                                        उंबरखेड (ता. चाळीसगाव) : 2 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त
सकाळी आठ वाजता आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक, शालेय समितीचे सदस्य तसेच मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य विभागातील कुष्ठरोग विषयक विशेष अधिकारी हमीद युसुफ पठाण साहेब उपस्थित होते. त्यांनी महात्मा गांधींनी समाजातील कुष्ठरोग निर्मूलनासाठी केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली व गांधीजींच्या सेवाभावी कार्याचा आढावा घेतला.

जयंतीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक मा. अनसारी नफीस जलील व मा. इफ्तिखार मुस्तफा साहेब यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शाळेचे शिक्षक जनाब फहीम अनीस सर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून आभार मानले.

कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष फिरोज पठाण साहेब यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. गांधी जयंतीचे औचित्य साधून शाळेमध्ये देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा, स्वच्छता आणि अहिंसा याबाबत जागृती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!