पंचायत समिती शिक्षण विभाग धरणगाव च्या वतीने मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यशाळा. संपन्न
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक 1. 10. 2025 पासून तीन दिवसीय मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यशाळा पंचायत समिती शिक्षण विभागाचे वतीने हिरा इंटरनॅशनल स्कूल इंग्लिश मीडियम या विद्यालयात संपन्न झाली. प्रथमतः पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले व कार्यशाळेला संबोधित केले व कार्यशाळेला सुरुवात झाली. या कार्यशाळेत मूल्यवर्धन प्रशिक्षणात सुलभक निलेश नेरकर यांनी वर्ग व्यवस्थापन विषयाबाबत आणि कार्यशाळेचा परिचय याबाबतीत सखोल मार्गदर्शन केले .दुसरे सुलभक किशोर मोरे सर यांनी आपल्या या कार्यशाळेला अध्ययन कौशल्य व मूल्यवर्धनाचा परिचय या बाबतीत मार्गदर्शन केले. तिसरे सुलभक मिलिंद जाधव यांनी संपूर्ण वर्ग चर्चा कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. सुलभक हिरवाडे मॅडम यांनी बहुभाषिक बहुवर्ग अध्यापन कसे करावे? याबाबतीत मार्गदर्शन केले. अशाप्रकारे तीन दिवसीय कार्यशाळेत सर्व शिक्षक बंधू भगिनींनी या कार्यशाळेत मूल्यवर्धन प्रशिक्षणा उत्तम रित्या ग्रहण केले. व आपापल्या शाळांवर जाऊन विद्यार्थ्यांमध्ये हे मूल्य कसे रुजवावे याविषयी सखोल माहिती या कार्यशाळेच्या माध्यमाने मिळाली. व कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळा यशस्वीतेसाठी लोखंडे सर तुळशीराम सैंदाणे व इतर विषय तज्ञ या सर्वांचे सहकार्य लाभले.

