*पी.बी.ए. इंग्लिश मिडियम स्कूलच्या अत्याधुनिक संगणक कक्षाचा उद्घाटन सोहळा .मा भूमिपुत्र आमदार श्री.अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न.*
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी * खा.शि. मंडळ संचलित अमळनेर नगरीतील इंग्लिश मिडियम स्कूलच्या कार्यकाळात वैभवशाली परंपरा राखून सर्वांची आवडती व प्रिय शाळा म्हणजे संत सखाराम यांच्या पावन पवित्र भूमीत असलेली शाळा म्हणजे पी.बी.ए. इंग्लिश मिडियम स्कूल याच शाळेमध्ये आधुनिक शिक्षण प्रणाली कास व आस धरून वेगवेगळे अत्याधुनिक कार्यप्रणाली कार्यान्वित करून विद्यार्थ्यांना “ई-लर्निंग”अशा प्रभावी माध्यमातून शिक्षण दिले जाते. याच परंपरेच्या अनुषंगाने पी.बी.ए. इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आधुनिक सर्व संगणक तंत्रज्ञान प्रणालीने युक्त संगणक कक्षाची निर्मिती करण्यात आली असून याच संगणक कक्षाचे उद्घाटन अमळनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शुभप्रसंगी खा.शि. मंडळाचे सर्व सन्मानीय कार्यकारी संचालक मंडळ उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगत भाषणातून मा. आमदार श्री. अनिल पाटील म्हणाले की सर्व तालुक्याला या शाळेचा सार्थ अभिमान वाटतो. व ही शाळा सदैव आधुनिकतेचा कास व आस धरून स्पर्धेच्या काळात घट्ट पाळेमुळे धरून प्रबल स्वरूपात आपले अस्तित्व टिकवून आहे. सदर कार्यक्रम अधिक यशस्वी होण्यासाठी शाळेचे चेअरमन श्री. प्रदीप अग्रवाल यांचे अतुलनिय योगदान प्राप्त झाले. सदर कार्यक्रम सफल यशस्वी या कार्यक्रमासाठी सर्वोत्तरपरी योगदान शाळेचे चेअरमन श्री. प्रदीप अग्रवाल मुख्याध्यापक श्री.जे.एस. देवरे पर्यवेक्षक श्री.महेश माळी पर्यवेक्षिका एम एस बारी, प्रशांत वंजारी, प्रिया शहा, करिष्मा जैन, व्ही.एस.अमृतकर, उर्वी देसले, कांचन सूर्यवंशी, व्हि.पी.बडवे, व्ही.जी.बोरोले, पी.आर.बोरसे, अनंत बागल, अशोक महाजन,राजश्री पाटील समस्त शिक्षक वृंदवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

