पी बी ए इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दिवाळी सुट्टी कालखंडात शा‌ळेच्या वतीने निशुल्क क्रिक्रेट शिबिराचे आयोजन विद्यार्थ्यांचा शिबीरास उदंड उत्स्फुर्त प्रतिसाद.*

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी
पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कुलच्या वतीने दिवाळी सुट्टी कालखंडात निशुल्क स्वरुपात क्रिकेट शिबाराचे आयोजन दिनांक 24-10-2025 ते 05-11-2025 पर्यंत करण्यात आले आहे.
खा.शि. मंडळाचे सर्व सदस्य व शाळेचे चेअरमन श्री प्रदिप अग्रवाल व मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांच्या संकल्पनेतून या शिबिराची संकल्पना व तिचे नियोजन तयार करण्यात आले व त्याचसोबत अमळनेर नगरीतील सुप्रसिद्ध जेष्ठ क्रिकेटर श्री.संजय पवार व त्यांचे बंधू श्री.सचिन पवार याचे अनमोल व तंत्रशुद्ध स्वरुपाचे प्रशिक्षण या शिबिराला लाभणार आहे.आज विद्यार्थी खेळापासुन दुरावला जात आहे शारीरिक दुर्बलता-व-विविध छोटे मोठ आजार यांना भेडसावत असतात. आपल्याला काटक- सशक्त व्हायचे असेल तर खेळाद्वारे शरीर व मन- प्रबल बनते व सर्व आजारावर आपण त्या प्रबळ, कणखर पणाने विजय मिळवून शरीराला चपळता व तंदुरुस्तपणा प्राप्त होतो याच भावनेतून व सक्षम हिंदुस्थान घडावा. हि भावना या शिबीराच्या माध्यमातून दिसून येते सदर शिबिरासाठी अनेक विदयार्थी या मध्ये सहभागी होऊन- क्रिकेट खेळामध्ये आपल्या अंतर्गत गुणांना वाव देण्याचे व्यासपिठ या शिबीराच्या माध्यमातुन त्यांना उपलब्ध झाले .
सदर शिबिरासाठी अनमोल मार्गदर्शन सहकार्य सर्वतोपरी खा. शि. मंडळाचे सर्व सदस्य व चेअरमन डॉ.श्री संदेश गुजराथी , शाळेचे चेअरमन श्री प्रदिप अग्रवाल ,मुख्याध्यापक जे एस देवरे, पर्यवेक्षिका – कु. मिनाक्षी बारी क्रीडा शिक्षक- श्री.विनायक सुर्यवंशी , श्री.रोहन मुंदडा, श्री.प्रशांत वंजारी व श्री. अनंत बागल व समस्त शिक्षक वृंद वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!