आपल्या सबबींचा नाश करा” — विषयावर नागरिकांना मिळाला आत्मविश्वासाचा संदेश धरणगावमध्ये प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न ब्रह्माकुमार रुपेशभाई, आबू पर्वत यांचे मार्गदर्शन

0

अमळनेर Express news

धरणगाव, २२ नोव्हेंबर २०२५ — प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, धरणगाव तथा समाज सेवा प्रभाग, माउंट आबू, राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने “Kill Your Excuses — बहाण्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे!” या विषयावर भव्य प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन विश्वकल्याणी भवन, डॉ. हेडगेवार नगर, एरंडोल रोड, धरणगाव येथे उत्साहात संपन्न झाले।

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आबू पर्वत येथून पधारेले ब्रह्माकुमार रुपेशभाई यांनी उपस्थित युवक व नागरिकांना जीवनातील यश, लक्ष्यनिर्धारण व आत्मविश्वासाचे महत्त्व यावर प्रभावी मार्गदर्शन केले। त्यांनी सांगितले —

“बहाण्यांची भिंत पाडा जरा, स्वतःवर विश्वास वाढवा जरा; मंजिल स्वतः येईल जवळ, फक्त ‘आजपासून’ काहीतरी करून दाखवा जरा!”

पुढे त्यांनी जीवनाचा उद्देश (Purpose of Life), जीवनाचे सिद्धांत (Principles of Life), जीवनातील वचने (Promises of Life) तसेच स्वतःशी केलेली प्रतिज्ञा (Pledge of My Life) या महत्त्वपूर्ण विषयांवर सोप्या आणि प्रभावी शैलीत प्रकाश टाकला।

या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता — समाजात यशाच्या मार्गातील सर्वात मोठी अडथळा परिस्थिती नसून आपण स्वतः तयार केलेले बहाणे आहेत ही जागृती निर्माण करणे।

या कार्यक्रमाचे आवाहन ब्रह्माकुमारी निता दीदी, प्रभारी, धरणगाव सेवाकेंद्र यांनी केले होते।

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते —
पि आय सुनीलजी पवार, सी. एस पाटील, लक्ष्मण पाटील, सुमित चौधरी, दीपक जाधव, सौ. पल्लवी शिंगाणे, ए. आर. पाटील, रविंद्र हर्पे तसेच सौ. डॉ डहाळे मेम

शेकडो युवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम प्रेरणा, सकारात्मकता आणि आत्मविश्वासाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी जीवनात नवीन सुरुवात करण्याची व बहाणे सोडून लक्ष्यपूर्तीकडे पहिले पाऊल उचलण्याची प्रतिज्ञा केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!