साने गुरुजी विद्यालयात मुख्याध्यापक संघाच्या वतीने विविध स्पर्धा संपन्न*

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी
जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या विद्या समिती अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, नैपुण्याला व अंगभूत कौशल्यांना वाव देण्यासाठी विविध तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते.‌
इयत्ता पाचवी ते सातवी पहिला गट तर आठ ते दहा दुसरा गट अशा वकृत्व, चित्रकला, निबंध , सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न झाल्या.‌ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख अतिथी म्हणून अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री तुषार बोरसे सर व निरीक्षक म्हणून अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव तथा अंतुर्ली विद्यालयाचे मुख्याध्यापक आर बी पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा तालुका मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्री सुनिल चुडामण पाटील यांनी केले. त्यात त्यांनी वक्तृत्व स्पर्धेतील नियम, अटीशर्ती इत्यादी नमूद केल्या. यावेळी साने गुरुजी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
वकृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना गटानुसार पाच ते सहा मिनिटांचा वेळ देण्यात आला.‌ त्यानुसार संबंधित विषयावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले विचार प्रकट केले. त्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना तीन मिनिटाचा वेळ देऊन उत्स्फूर्त फेरीमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यातून स्पर्धेतील प्रथम ,द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली .यातील प्रत्येक गटातील प्रथम क्रमांक जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होईल

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री घोरपडे यांनी सांगितले की, उत्तम वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता होणे आवश्यक आहे त्याचबरोबर विविध पुस्तकांच्या वाचनाचा छंद जोपासणे खूप महत्त्वाचा आहे.
तालुका स्पर्धेतील विजय स्पर्धक पुढील प्रमाणे
**पहिला गट ( इ. ५वी ते ७वी):-*
प्रथम क्रमांक :-कु. रितिका अरुण पाटील (इयत्ता पाचवी) द्रौ. रा. कन्या शाळा अमळनेर
द्वितीय क्रमांक :- हिमांशू भूषण चौधरी ( इयत्ता सातवी) आदर्श विद्यालय अमळगाव
*दुसरा गट( इ. ८वी ते १०वी)*:-
प्रथम क्रमांक :- मयूर गजानन पाटील (इयत्ता आठवी) साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर
द्वितीय क्रमांक:- भूमिका राहुल पाटील (इयत्ता नववी )साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर
तृतीय क्रमांक:- प्राची विनोद पाटील (इयत्ता नववी) आदर्श विद्यालय अमळगाव
सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे तालुका मुख्याध्यापक संघाकडून मनःपूर्वक अभिनंदन
सदर कार्यक्रमाला परीक्षक म्हणून श्री मनीष उघडे व श्री नितीन सोनवणे यांनी तर टाईम किपर म्हणून श्री महेंद्र चव्हाण यांनी काम पाहिले. श्री दिलीप पाटील, श्रीमती शेवाळे मॅडम यांचही कार्यक्रमाला सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी ए धनगर यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील श्री देवेंद्र पाटील श्रीमती शारदा उंबरकर श्रीमती यशोदा महाले गोपाल बडगुजर कुणाल चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!