महात्मा फुले हायस्कूल येथे ज्ञानज्योती सावित्रीमाई जन्मोत्सव साजरा !…
अमळनेर Express news
वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेतील मुलांना १०० दफ्तर देणार : जितेंद्र महाजन
धरणगाव प्रतिनिधी :
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ३ जानेवारी महिला दिन, बालिका दिन व महिला शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षीका एम के कापडणे मॅडम या होत्या. शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार व मान्यवरांच्या हस्ते कवयित्री सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमात सुरुवात झाली. त्यानंतर एच डी माळी यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित घटनांचा आढावा घेतला. व त्यांच्या सहकारी शिक्षिका फातीमाबी शेख यांच्या कार्यावर प्रकाश टाकला त्यानंतर व्ही टी माळी यांनी सावित्रीमाई फुले यांचे जीवन कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा एम के कापडणे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार शिक्षणाचे महत्त्व व स्त्रीयांची सर्वांगीण प्रगती याबद्दल मार्गदर्शन केले.आपल्या अध्यक्षीय मनोगतात सावित्रीबाईंचे कार्य सर्व महिला व मुलींसाठी एक आदर्श व प्रेरणास्त्रोत आहे. त्यांचे विचार व शिकवण अंगी बाणवण्याचे आवाहन सर्व विद्यार्थ्यांना केले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कै.राजेंद्र किसन महाजन (माजी नगरसेवक ) यांच्या स्मरणार्थ श्री जितेंद्र राजेंद्र महाजन यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना १०० दप्तर देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एस व्ही आढावे यांनी केले.

