सडावन येथे महाशिवरात्री चे औचीत्य साधून कला आणि विज्ञान प्रदर्शन 2026 (वर्ष दुसरे) शिवप्रेमी क्लासेस व ज्ञानदा वाचनालय , सडावन यांच्या वतीने आयोजित पंचक्रोशीतील सर्व गावांचा प्रदर्शन पाहण्यासाठी उदंड प्रतीसाद..
अमळनेर Express news
सडावण येथे महाशिवरात्री सणाचे औचीत्य साधून शिवप्रेमी क्लासेसच्या वतीने शालेय स्तरा वरील विद्यार्थ्यांसाठी कला आणि विज्ञान प्रदर्शन 2026 (वर्ष दुसरे) प्रदर्शनाचे आयोजन -करण्यात आले होते सदर प्रदर्शनाचे आयोजन गावातील शिवप्रेमी क्लासेस चे संचालक तसेच ज्ञानदा वाचनालय चे अध्यक्ष श्री शिवप्रेमी चंद्रकांत पाटील सर .. सरदार क्लासेस अमळनेर चे शिक्षक श्री प्रफुल्ल संदानशिव सर , ज्ञानदा वाचनालय तसेच या गावातील सैन्य दलात भरती झालेले सैनिक, गावातील तरुण मंडळी व स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करीत असलेल्या विद्यार्थी मित्र परिवाराच्या सहकार्याने संपन्न -झाले तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. नायब तहसिलदार प्रशांत धमके रावसाहेब, सुंदरपट्टी चे माजी संरपच श्री सुरेश अर्जुन पाटील (तालुका अध्यक्ष शिवसेना), श्री मोरे सर, श्री लोकनियुक्त सरपंच सडावण , श्री भैय्यासाहेब पाटील, बागड सर , सरदार क्लासेस चे संचालक राहुल सरदार सर ,पूजा मॅडम, महेंद्र सर, रोहित सर,वैशाली मॅडम, यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पन. दिपप्रज्वलन करण्यात आले.गावातील सर्व मराठी शाळांतील तसेच सेवक व प्रतिभावान विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात उत्साहाने सहभाग घेतला . विद्यार्थ्यांनी आपल्या बौध्दीक कौशल्य व आपल्या वैज्ञानीक जिज्ञासा प्रचंड आवडीच्या शक्तिबळावर वेग वेगळ्या प्रयोगाचे सादरीकरण केले., यात अमळनेर तालुक्यातील गावातील विद्यार्थ्यांचा सहभाग देखील होता..तसेच एक विद्यार्थीनी वापी (गुजरात) हून देखील सहभागी झाली होती.. एवढ्या ग्रामीण भागात -होणारे एक आगळे-वेगळे तसेच संपूर्ण पंचक्रोशीतील गावांचा उदंड प्रतिसाद लाभला .. कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्रशांत वंजारी सर यांनी केले . कार्यक्रमाच्या शेवटी सैन्य दलात नुकतेच भरती झालेले कल्पेश पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला….

