विजय नाना आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अमळनेर येथे शिवजयंती निमित्त व्याख्यान– दयाराम पाटील सर.
अमळनेर एक्सप्रेस न्युज
अमळनेर प्रतिनिधी
युवा कल्याण प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम
कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे, स्वराज्याची स्थापना करून शेतकरी ,कष्टकरी ,महिला आणि अठरापगड जातीच्या लोकांना सन्मान ,संरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले .व रयतेच्या हिताला सर्वोच्च स्थान दिले . शिवरायांच्या जयंती निमित्त विजय नाना आर्मी स्कूल अँड कॉलेज शिवचरित्रावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बि डी पाटील सर तसेच प्रमुख वक्ते दयाराम पाटील सर ,प्रमुख पाहुणे बापूराव ठाकरे ,व ज्येष्ठ शिक्षक विचार पिठावर उपस्थित होते .प्रमुख वक्ते व पाहुण्यांचा परिचय उमेश काटे सर यांनी करून दिला. यानंतर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख वक्ते ,पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष ,व जेष्ठ शिक्षकांनी केले . यावेळी प्रमुख वक्ते व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रमुख वक्ते दयाराम पाटील सर यांनी आपल्या व्याख्यानातून शिवचरित्र म्हणजे नेमके काय.? शिवाजी महाराज घडले म्हणजे नेमकं काय झालं? हे सर्व समजून घेताना जिजाऊंनाही समजून घ्यावे लागेल ,व शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य कसे विश्ववंदनीय आहे यावर प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आर एम शिंदे सर, वाय वाय पाटील सुभेदार मेजर श्रीराम पाटील नायब सुभेदार भटू पाटील जगदीश पाटील प्राजक्ता शिंदे संदीप वाघ टि के पावरा संजीवनी पाटील गायत्री पाटील आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले घनश्याम देसले या विद्यार्थ्याने शिवगर्जना केली विद्या विद्यालयातील विद्यार्थी मयूर पाटील याने सूत्रसंचालन केले व संदेश कोकणी याने आभार मानले

