धरणगाव तालुका स्तरीय दोन दिवसीय व्यवसायिक व शिक्षण उद्योजकता प्रशिक्षण
अमळनेर Express news
आज दिनांक 10 3 2026 रोजी महात्मा फुले हायस्कूल. विद्यालयात धरणगाव तालुका स्तरीय दोन दिवसीय व्यावसायिक व शिक्षण उद्योजक प्रशिक्षण सुरू झाले या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक राजेंद सैंदाणे यांनी केले प्रशिक्षणाला संबोधित करतांना गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले यांनी व्यवसायीक प्रशिक्षणाबद्दल सुक्ष्म माहिती सांगितली व व्यवसायीक प्रशिक्षण किती महत्त्वाचें आहे यावर प्रकाश टाकला तसेच या प्रशिक्षणाचे सुलभक मनोज गुजर सर ,रंजना प्रदिप नेहते या सुलभकांनी व्यावसायिक शिक्षण व उद्योजक प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी कसे उपयुक्त आहे यावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीराम सैंदाणे यांनी केले

