धरणगावात राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांना वंदन !

0

अमळनेर Express news

जगातील सर्वोत्तम मातृत्व माँसाहेब जिजाऊ; ज्योती पाटील (अध्यक्षा-जिजाऊ ब्रिगेड)

युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद : उषाताई वाघ (माजी नगराध्यक्षा)

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगांव : शहरातील कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय यांच्या स्मारकाजवळ राजमाता-राष्ट्रमाता-मॉंसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व सत्यशोधक समाज संघ यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम जिजाऊ वंदनाचे सामुहीक गायन करण्यात आले. यानंतर माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, वैशाली पवार, ललिता वाघ, वेणू पाटील, ज्योती पाटील, जागृती पाटील, मनीषा पाटील, किरण पाटील, पुष्पा महाजन, गिरीष्मा पाटील, वैशाली मराठे, जयश्री पाटील, रेखा पाटील, पुष्पा पाटील, या सर्व महिलांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.
याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेड व सत्यशोधक समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सौ.ललिता राजेंद्र वाघ यांचा शाल – ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. सौ ललीता वाघ यांना ३ जानेवारी रोजी सावित्री शक्तीपीठ पुणे या सामाजिक संघटनेकडून सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संजय महाजन, उद्योजक जीवनसिंह बयस, शिवसेना उबाठाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. शरद माळी, आरटीआय चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील,
संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, मराठे समाजाध्यक्ष भरत मराठे, माळी समाज कार्याध्यक्ष व्ही टी माळी, दिपक जाधव, रावसाहेब पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष धर्मराज मोरे, पत्रकार भगीरथ माळी, विनोद रोकडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष विलास महाजन, शिवसेना उबाठाचे लीलाधर पाटील, विलास चौधरी, नामदेव मराठे, भीमराज पाटील, एच डी माळी, हेमंत मराठे, वाल्मीक पाटील, बापु जाधव, ॲड.कैलास मराठे, प्रथम सूर्यवंशी, सुनील देशमुख, भैय्या धनगर यासह सर्व समाजातील पुरुष,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!