राष्ट्रमाता राजमाता मॉसाहेब जिजाऊंना विनम्र अभिवादन.
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या जयंती निमित्त अमळनेर येथील जिजाऊ प्रेमींनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला अभिवादन केले .सर्वप्रथम वसुंधरा लांडगे मॅडमने, व वैशाली शेवाळे मॅडम यांनी जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आला. व उपस्थित सर्व जिजाऊ प्रेमींनी जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन केले. या कार्यक्रमात वसुंधरा लांडगे मॅडम यांनी जिजाऊंच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकला. बालमनामध्ये हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या महामातेने रोवली त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या त्यागाचा शौर्याचा ,व एक आई कशी असावी,आपल्या मुलाप्रती कशी शिकवण अलावा, स्वराज्यासाठी छत्रपतींना कशा प्रकारची शिक्षण दिला. यावर प्रकाश टाकण्यात आली. जिजाऊ गेट परिसर स्वच्छ करण्याकामी प्रशांतजी निकम यांनी स्वखर्चाने योगदान दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदरणीय मनोहर निकम्मे, वसुंधरा लांडगे मॅडम, वैशाली शेवाळे मॅडम ,सुभाष जिभाऊ, गणेश पवार ,प्रशांत निकम, नितीन पाटील, संदीप पवार ,दशरथ सांडगे, श्रीकांत चिखलोदकर आदी जिजाऊ प्रेमी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली शेवाळे मॅडम यांनी केले.

