गुड शेफर्ड शाळेमध्ये सत्यशोधक समाज संघाचा सामाजिक उपक्रम!…

0

अमळनेर Express news

गुड शेफर्ड शाळेमध्ये सत्यशोधक समाज संघाचा सामाजिक उपक्रम!…

आदर्श महामाता ” हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – चैताली रावतोळे ( मुख्याध्यापक )

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगांव – शहरातील गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे ३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, ९ जानेवारी फातिमाबी शेख जयंती व १२ जानेवारी माँसाहेब जिजाऊ जयंती निमित्त सत्यशोधक समाज संघ आयोजित “स्त्री सन्मान मार्ग ” प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पी डी पाटील लिखित “आदर्श महामाता ” हे छोटे पुस्तक घेतले. मुलांनी पुस्तकाचे वाचन केले व त्यावर आधारित २५ गुणांची प्रश्नपत्रिका काढण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. लहान गटात प्रथम – जानवी सचिन पाटील, द्वितीय – यश विनोद मोहकर, तृतीय – समीक्षा पुरुषोत्तम पाटील व मोठ्या गटात प्रथम – हर्षल प्रमोद पाटील, द्वितीय – विनय नरेंद्र जैन, तृतीय – अजिंक्य साहेबराव महाजन आला. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक चैताली रावतोळे, हायस्कूल मुख्याध्यापक नाजनीन बानो शेख, शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना महापुरुषांचे ग्रंथ व सत्यशोधक समाज संघाची दिनदर्शिका भेट स्वरूपात देण्यात आली.
या प्रश्नमंजुषाचे मुख्याध्यापक रावतोळे यांनी स्वागत केले या पुस्तकाच्या माध्यमातून माँसाहेब जिजाऊ, अहिल्यामाई होळकर, सावित्रीमाई फुले, फातिमाबी शेख व त्यागमूर्ती रमाई या महामातांचे जीवन कार्य मुलांपर्यंत पोहोचले. हे आदर्श महामाता हे पुस्तक मुलांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ते पुस्तक अभ्यासून महामातांच्या विचारांवर चालणे गरजेचे आहे असे प्रतिपादन रावतोळे यांनी केले. या प्रश्नमंजुषाचे आयोजन सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष व आदर्श महामाता या पुस्तकाचे लेखक पी डी पाटील यांनी संपूर्ण धरणगाव तालुक्यात विविध शाळांमध्ये केलेले आहे.

“आदर्श महामाता ” हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – चैताली रावतोळे ( मुख्याध्यापक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!