मकर संक्रांत सूर्याची कृतज्ञतेता व्यक्त करण्याचा दिवस !!!!!
अमळनेर Express news
मानव हा उत्सव प्राणी आहे. जगात सर्वच संस्कृतीमध्ये सणांची परंपरा दिसून येते. मानवा समाजशील प्राणी असल्याने त्याला एकत्रित येऊन आनंद घेण्यात रस आहे. भारताला सिंधू संस्कृती पासूनच सण, उत्सव साजरी करण्याची देदीप्यमान परंपरा आहे. निसर्गाने केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी त्याने अनेक सण-उत्सव सुरू केले. असाच एक सण म्हणजेच मकर संक्रांत होय. ह्या दिवसापासून मकर राशीमध्ये प्रवेश करीत असतो. मकर मध्ये सूर्याचा प्रवेश होतो म्हणजेच सूर्य मकर राशीमध्ये संक्रमण करीत जातो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं. भोगीचा अर्थ भोग लावण्याची संबंधित आहे. देवाला विविध अन्नाचा भोक देण्याची परंपरा भारतात दिसून येते. जैन समाजामध्ये सुद्धा अशी परंपरा असल्याने शंभर पेक्षा जास्त देवाला नैवेद्य दिली जातात. असाच पूर्वी बाजरीची भाकर व निसर्गातील अनेक भाज्यांची एकत्रित भाजी बनवली जायची आणि तो भोग म्हणजेच नैवेद्य देवाला ठेवून मगच जेवण करण्याची परंपरा होती. बाजरी हे कडधान्य थंडीच्या दिवसांमध्ये अतिशय पोषक तसेच हिवाळ्यामध्ये खाल्लेल्या पौष्टिक आहाराचे शरीरात चांगल्या प्रकारे पोषण होते म्हणून ह्या ऋतूत येणाऱ्या सर्व भाज्यांचा पौष्टिक पदार्थांचा वापर आहारामध्ये केला जात होता. मकर संक्रांतीच्या सणाबद्दल काही काल्पनिक गोष्टी सुद्धा त्या जोडलेलया आहे.शंकरासूर, किंक्रांत राक्षसाला मारण्याच्या कथा काल्पनिक आहेत.
सिंधू संस्कृतीमध्ये वैज्ञानिकतेला महत्व दिले जात होते त्यामुळे सूर्याच्या मकर राशीत जाण्याच्या प्रवेशाला सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस साजरा करु लागला. कालांतराने त्या सणाला आलेल्या विविध खाद्यपदार्थांचा वापर होऊ लागला.तिळगुळ हा पदार्थ बनवण्याची प्रथा होती. त्यामुळे हिवाळ्यामध्ये तीळ आणि गूळ वाटप केले जात होते. तीळ हा स्निग्ध पदार्थ व खाण्याला पौष्टिक गुळ याची मिश्रण म्हणजे आरोग्यदायी जीवनाला पूरक आहार होता. त्यातून एकत्रित येऊन तिळगुळ वाटण्याची परंपरा सुरू झाली.
एकमेकांच्या झालेल्या भांडणाचे, विवादाचे रूपांतर सुसंवादात करण्याचा हा दिवस महत्त्वाचा ठरला. मानवाने सूर्याप्रमाणे तेजस्वी राहुन आपल्याशी ऋणानुबंध जुळलेल्या व्यक्तींना प्रेमाने ,आपुलकीने ,स्नेहाने जुळून घेण्याचा हा दिवस आहे. कोणतेही वाद मानवाला प्रगतीवर येत नाही. बहुतेक वादातून संवादाकडे वाटचाल करणे ही आपली संस्कृती आहे. भारत देशात अनेक विचार धारा जन्माला आल्या. त्यांचे अस्तित्व आजतागायत टिकून आहे. द्वेत, अद्वैत, सगुण, निर्गुण, निराकार, सख्ख्य, मधुर भक्ती अशा अनेक प्रकारच्या विचारधारा भारतामध्ये निर्माण झाल्या. आध्यात्मिक विचाराचा आनंद देणाऱ्या या परंपरा पूर्वी चांगल्या विचाराने निर्माण झाल्या होत्या. परंतु आज धर्म जोडण्याचे साधन न होता धर्माधर्मात विषमता निर्माण करण्याचे साधन झाले आहे. धर्माचा खरा अर्थ जगाला प्रेम अर्पित करणे आहे. आज धर्माचे अनुयायी स्वतःचा धर्म मोठा इतरांचा धर्म खोटा हुकूमशाही जगात सुरू आहे. वैश्विक विचारधारेने धर्म जवळ आले नाहीत. विचारधारा जरी अलग असल्या तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून धर्मा धर्मात वाढला नाही. धर्म मार्तंड वेळोवेळी एकमेकांच्या धर्माविरुद्ध विकृत कारवाया करीत असतात. काही धर्म जगात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जग शांततेने, अहिंसेने नांदण्याचा विचार धर्मांमध्ये दिसून येत नाही. आज मकर संक्रांत हा दिवस तिळगुळ घ्या गोड गोड बोला ह्या विचाराने साजरा होतो. प्रत्यक्ष मात्र औपचारिकता पाळली जाते. एकमेकातील वैरभाव कमी करण्याचा हा दिवस आहे. सूर्याची प्रखरता अंधाराला दूर करते त्याप्रमाणे मानवाने आपल्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर केला पाहिजे ही शिकवण हा सण देऊन जातो. हिवाळ्यातील ऊब ज्याप्रमाणे अल्हाददायक, आनंददायक असते. तशी प्रेमाची, आपुलकीची ऊब मानवाने जीवनात एकमेकांना दिली पाहिजे. बौद्ध धर्मात मधले आहे “मुसा वादा वेरमणी सिक्कापदं समाधीयामी”म्हणजेच केवळ गोड बोलू नका तर सत्य बोला.. गौतम बुद्धांनी जगामध्ये असलेल्या अज्ञानाविरुद्ध क्रांती केली. सत्य काय आहे हे जगापुढे आणले. सिंधू संस्कृतीतील महापुरुष हे सत्य सांगण्याचा प्रयत्न करीत असत. त्या सत्याच्या मार्गाने ते जात असत. महात्मा फुले यांनी यासाठीच धर्माधर्मातील निर्माण झालेला कचरा दूर करण्यासाठी खोट्या गोष्टी , खोट्या कल्पना याविरुद्ध आवाज उठविला. जे सत्य आहे तेच खरं आहे हे मांडण्याचा अटोकात प्रयत्न केला. सत्यशोधक समाजाची निर्मिती त्यासाठी झालेली आहे. पृथ्वी ही शेषनागाच्या फणावर उभी नसून ती अवकाशात सतत फिरणारी आहे. स्वर्ग, नरक, पाताळ या कल्पना खोट्या आहेत. प्रत्यक्ष या कल्पनांचा शोध कोणीही लावू शकलेले नाही. अशा भ्रामक कल्पना अजूनही चालू आहेत. माणसाने गोड बोलण्यापेक्षा सत्य बोलले तर जगात वैचारिक क्रांती होईल. मकर संक्रांती पासून सूर्याची किरणे पृथ्वीवर सरळ रेषेत पडत असल्याने उष्णता वाढण्याचे प्रमाण वाढत जाते. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. निसर्ग हा आपल्याला सतत देण्याचे काम करीत असतो. आज सूर्यापासून निर्माण होणारी सौर ऊर्जा मानवाला वरदान ठरलेली आहे. निसर्गाचा आपण फक्त वापर करीत असतो. निसर्गाला देण्यासाठी आपल्याकडे काय आहे ?तर उत्तर मिळते काही नाही परंतु निसर्गामध्ये असलेल्या वस्तूंचे संवर्धन, संरक्षण करणे आपल्या हातात असते. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!
पत्रकार
एस.एच.भवरे

