देशातील नंबर वन पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्ष पदी उमेश काटे तर शहर अध्यक्ष पदी जयंतलाल वानखेडे
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
देशातील व देशाबाहेरील अनेक देशांमध्ये नंबर वन पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना दि.८ जानेवारी रोजी मंगळ ग्रह परिसरात झालेल्या बैठकीत सर्वानुमते व्हॉइस ऑफ मीडिया अमळनेर तालुका अध्यक्ष पदी उमेश काटे तर व्हॉइस ऑफ मीडिया शहर अध्यक्ष पदी जयंतलाल वानखेडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
अमळनेर शहरातील पवित्र धार्मिक स्थान असलेल्या मंगळ ग्रह मंदिर परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार संघटनेची बैठक व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जेष्ठ पत्रकार आदरणीय डिगंबर महाले सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रदेश सरचिटणीस जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले सर, जिल्हा संघटक जयेश काटे सर, साप्ताहिक विंगचे जिल्हा अध्यक्ष संजय सूर्यवंशी, साप्ताहिक विंगचे तालुकाध्यक्ष अजय भामरे यांच्या उपस्थितीत अमळनेर तालुका अध्यक्ष पदी उमेश काटे तर शहर अध्यक्ष पदी जयंतलाल वानखेडे यांची सर्वानुमते खेळीमेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली. सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष यांचा सत्कार करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नवीन तालुका कार्यकारणी गठित करणे, सभासदांच्या परिवाराची वैद्यकीय चाचणी शिबिराचे आयोजन करणे, सभासदांच्या मुलांच्या शिक्षणाला गरजेनुसार मदतीचा हात पुढे करण्यावर विचार विनिमय करणे आदी बाबतीत बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्व स्तरातून नूतन तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष यांचे अभिनंदन होत आहे.
तालुका अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांना पुढील वाटचालीसाठी धनंजय सोनार, ईश्वर महाजन, उमेश धनराळे, गौतम बिऱ्हाडे , जयेश काटे, विनोद कदम, रविंद्र मोरे,अजय भामरे, राहुल पाटील दयाराम पाटील संजय पाटील, जितेंद्र पाटील, विवेक अहिराव, मिलिंद पाटील, दिनेश पालवे, उमाकांत ठाकूर, बापुराव ठाकरे, दिनेश नाईक, रजनीकांत पाटील, किरण चव्हाण, सुखदेव ठाकूर, मधुसूदन विसावे, कमलेश वानखेडे, भूषण महाले, पंकज पाटील यांनी अभिनंदनाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या.

