बोरगाव हायस्कूलमध्ये महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा !…
अमळनेर Express news
“आदर्श महामाता ” हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – एस.एच.महानुभव ( मुख्याध्यापक )
लहान गटात – कल्याणी मराठे प्रथम तर मोठ्या गटात वैष्णवी भामरे प्रथम !….
धरणगाव प्रतिनिधी –
धरणगांव – तालुक्यातील बोरगाव येथील सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय येथे महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त सत्यशोधक समाज संघ आयोजित “स्त्री सन्मान मार्ग ” प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पी डी पाटील लिखित “आदर्श महामाता ” हे छोटे पुस्तक घेतले. मुलांनी पुस्तकाचे वाचन केले व त्यावर आधारित २५ गुणांची प्रश्नपत्रिका काढण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. लहान गटात प्रथम – कल्याणी मराठे, द्वितीय – देविका शेडगे, तृतीय – प्रांजल पाटील व मोठ्या गटात प्रथम – वैष्णवी भामरे, द्वितीय – खुशी मोरे, तृतीय – साक्षी पाटील आली. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक एस.एच. महानुभव यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना महापुरुषांचे ग्रंथ, लेखणी ( पेन ) व सत्यशोधक समाज संघाची दिनदर्शिका भेट स्वरूपात देण्यात आली.
या प्रश्नमंजुषाचे मुख्याध्यापक महानुभव यांनी स्वागत केले या पुस्तकाच्या माध्यमातून माँसाहेब जिजाऊ, अहिल्यामाई होळकर, सावित्रीमाई फुले, फातिमाबी शेख व त्यागमूर्ती रमाई या महामातांचे जीवन कार्य मुलांपर्यंत पोहोचले. हे आदर्श महामाता हे पुस्तक मुलांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ते पुस्तक अभ्यासून महामातांच्या विचारांवर चालणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महानुभव यांनी केले. या प्रश्नमंजुषाचे आयोजन सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष व आदर्श महामाता या पुस्तकाचे लेखक पी डी पाटील यांनी संपूर्ण धरणगाव तालुक्यात विविध शाळांमध्ये केलेले आहे. प्रश्नमंजुषा यशस्वीतेसाठी व्ही.टी.पाटील व सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

