मिलिंद प्रभाकर पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
अमळनेर Express news अमळनेर दि. शिक्षकाचा खरा आरसा हा त्याचा विद्यार्थी व पालक वर्ग असतो.दरवर्षी विद्यालय पातळीवर लोंढवे येथील जेष्ठ नागरिक सेवानिवृत्त शिक्षक गुरुवर्य-निळकंठ तुळशीराम पाटील यांच्या तर्फे “आदर्श शिक्षक” पुरस्कार देण्यात येतो. २६जाने.ला सदरचा ” *आदर्श-शिक्षक* ” पुरस्कार हा लोंढवे,ता. अमळनेर येथील स्व. आबासो. एस. एस.पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक *मिलिंद प्रभाकर पाटील* यांना देऊन त्यांचा शाळा व ग्रामस्थांतर्फे सन्मान करण्यात आला.
संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉ. बि. एस. पाटील,निळकंठ तुळशीराम पाटील,मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील,सरपंच-सौ.भारती अशोक पाटील, यांच्या हस्ते
हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी अशोक शालीग्राम पाटील, उपसरपंच-चतुर नवल पाटील,ग्रामसेवक-देविदास माळी, पोलीस पाटील-प्रभाकर पाटील,ग्रामपंचायत सदस्य-मिनाबाई जिजाबराव पाटील,मोनिका पाटील,मुकेश सुभाष पाटील,ज्ञानेश्वर पाटील,सुनील खैरनार, संतोष पाटील,ज्ञानेश्वर पाटील आदी मान्यवर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

