*डॉ. होमी भाभा फाउंडेशन मुंबई संचलित MSAT टॅलेंट सर्च परीक्षेत पी.बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी मोहित देवरे राज्यातून दुसरा. त्याची इस्रो भेटीसाठी निवड*

0

अमळनेर Express news

डॉ. होमी भाभा फाउंडेशन मुंबई संचलित MSAT टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन समस्त महाराष्ट्र राज्यातून करण्यात आले होते. अतिशय प्रतिष्ठेची बौद्धिक कौशल्य पणास लावणारी तसेच विद्यालय स्तरीय स्वरूपात विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्वरूपात कामगिरी त्यांच्याकडून घडवून घेणारी ही उपरोक्त स्पर्धा असते. समस्त महाराष्ट्र राज्यातून प्राथमिक फेरीसाठी सव्वा लाख विद्यार्थी या स्पर्धेसाठी बसत असतात. सदर स्पर्धेचे एकूण तीन पात्रता फेरी असतात. सदर विद्यार्थ्यांना सदर संस्थेकडून ऑनलाईन मार्गदर्शन व आवश्यक ज्ञान हे देण्यात येत असते. सदर सर्व बाबींचा अभ्यास करून त्या परीक्षेचा याचा समस्त आराखडा तयार करून मग या परीक्षेला बसून आपले समस्त कौशल्य पणास लावून या परीक्षेसाठी पात्र ठरत असतात. या सर्व बाबी पार करून पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी चि. मोहित सुनील देवरे इयत्ता नववी या गटातून समस्त महाराष्ट्र राज्यातून दुसऱ्या क्रमांकाचे उत्तीर्ण झाला असून त्यास सात हजार रुपये रोख रक्कम बक्षीस व भारतीय अंतराळ संस्था इसरो भेटीसाठी त्याची निवड झाली आहे. पात्रता परीक्षा फेरी पुढील प्रमाणे संपन्न व पार पडल्या. प्रथम पात्रता फेरी- 23 विद्यार्थी, द्वितीय पात्रता फेरी- 21 विद्यार्थी, तिसरी पात्रता फेरी -(मुलाखत) 2 विद्यार्थ्यांची निवड इंग्लिश मीडियम स्कूल मधून झाली व त्यामध्ये मोहित देवरे व पियुष पाटील हे दोन्ही विद्यार्थी इयत्ता नववी मधून होते. त्यातून चि. मोहित देवरे यांनी ऐतिहासिक कामगिरी करून समस्या जळगाव जिल्ह्याचा बहुमान वाढविण्याचा तसेच अमळनेर नगरीचे नाव ऐतिहासिक स्वरूपात नोंदविण्याचा कार्य कामगिरी त्यांनी केली आहे. त्याच्या माध्यमातून दुर्मिळ कामगिरी ही झाली आहे व अमळनेर नगरीचा नावलौकिक समस्त भारतातून झळकावले आहे. आकाशाला गवसणी घालण्याचे काम त्याच्या माध्यमातून घडवून आले. त्याला विज्ञान व गणित या विषयाचे सखोल मार्गदर्शन विज्ञान शिक्षिका सुवर्णा भावसार (बोहरे), मुख्याध्यापक जे. एस. देवरे व समस्त विज्ञान शिक्षक यांनी केले. समस्त उपक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन सहकार्य सर्वतोपरी सहाय्य शाळेचे चेअरमन श्री प्रदीपजी के. अग्रवाल, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही पी बडवे ,व्ही. एस अमृतकर, श्रावण पाटील, प्रशांत वंजारी, स्वाती माळी, डिंपल देसाई, योगिषा महाजन समस्त शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!