संविधानाच्या अमृत महोत्सवी पष्टणे तालुका धरणगाव येथे ग्राम संमेलन उत्साहात.
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी पष्टाने तालुका धरणगाव येथे दिनांक 26 1 2025 या प्रजासत्ताक दिनी म्हणजे संविधानाच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त ग्राम संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील होते प्रमुख पाहुणे माननीय प्रतापराव जी पाटील जिल्हा परिषद सदस्य माननीय संजय पवार जेडीसीसी बँक जळगाव चेअरमन माननीय गोपाल बापू चौधरी माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय पीसी आबा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय प्राध्यापक अशोक पवार सर युवा कल्याण प्रतिष्ठान अध्यक्ष माननीय डी जे पाटील माजी समन्वय समिती धरणगाव माननीय डी ओ पाटील शिवसेना तालुकाप्रमुख श्रीमती भावनाताई भोसले गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती धरणगाव माननीय जिजाबराव पाटील तालुका अध्यक्ष भाजपा तथा कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव माननीय प्रेम राज पाटील सोनवद माजी पंचायत समिती सदस्य माननीय कैलास पाटील तालुका अध्यक्ष सरपंच परिषद धरणगाव माननीय महेंद्र सूर्यवंशी तहसीलदार धरणगाव माननीय पवन जी देसले साहेब पोलीस निरीक्षक धरणगाव श्री आर व्ही पाटील सर सरिता ताई कोल्हे महिला जिल्हा अध्यक्ष शिवसेना श्री गोविंदा मिस्तरी केंद्रप्रमुख केंद्र पष्टाने वरील सर्व मान्यवर ग्राम संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व या धकाधकीच्या जीवनातून ग्रामस्थांना एक विरंगुळा मिळावा व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पष्टाने येथील ग्रामस्थांनी ग्राम संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री प्रतापराव जी पाटील जिल्हा परिषद सदस्य यांनी केले व ग्राम संमेलनास सुरुवात झाली या ग्राम संमेलनात माध्यमिक विद्यालय पष्टणे येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ग्राम संमेलनाची शोभा वाढवली. तसेच जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ग्राम संमेलनास संमेलनात सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रम केले .उद्घाटक प्रतापराव जी पाटील यांनी आपल्या मनोगतात ग्रामसंमेलन अभिनव असा उपक्रम असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यातून वाव मिळतो असे प्रतिपादन केले तसेच प्रमुख पाहुणे प्राध्यापक अशोक पवार यांनी आपल्या मनोगतात स्पष्टाने येथील ग्रामस्थांचे तोंड भरून कौतुक केले .मी पहिल्यांदाच असे ग्राम संमेलन पाहतो आहे असा उल्लेख त्यांनी केला. या कार्यक्रमात माध्यमिक विद्यालयातील आदिवासी गीताला भरभरून प्रतिसाद मिळाला .या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांच्या नजरेतील शिक्षक व कायम अशा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांच्या कलागुणांना वाव देणारे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सतत झटणाऱ्या शिक्षकांना ग्रामपंचायतीतर्फे शिक्षक पुरस्कार देण्यात आला. यात माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक दयाराम आनंदराव पाटील तसेच जिल्हा परिषद शाळेतील वाणी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला भविष्यात असे उल्लेखनीय काम करणाऱ्यांना ग्रामपंचायती तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येईल असे ग्रामस्थांनी प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दयाराम आनंदराव पाटील माध्यमिक विद्यालय उपशिक्षक यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच बाहुबली ऑर्केस्ट्रा ग्रामसेवक अप्पा तलाठी भाऊसाहेब पष्टाने बुद्रुक व पष्टाने खुर्द संपूर्ण ग्रामस्थांनी श्रम घेतले

