सेवानिवृत्त डायट प्राचार्य अप्पासाहेब नीळकंठ गायकवाड यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन*

0

अमळनेर Express news
[ डॉ .कलाम पुस्तक भिशी तर्फे साहित्यिकांना आवाहन ]
सेवानिवृत्त असूनही निरंतर आजीव ऋषितुल्य ज्ञानदाता ,चिरतरुण समाजशिक्षक , अनेक ज्ञात अज्ञातांचे मानसगुरु , अनेक शैक्षणिक संस्थांचे व शैक्षणिक प्रकल्पांचे अजातशत्रू दिपस्तंभ अर्थात जळगाव डायटचे निवृत्त प्राचार्य आदरणीय नीळकंठ गायकवाड साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होत आहे.अप्पासाहेब नीळकंठजी गायकवाड यांच्या गौरवार्थ लेख व काव्य स्पर्धेचे आयोजन भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे करण्यात आले आहे.पुरस्कार हे ‘ साधन ‘ आहे.
अप्पासाहेबांचा प्रत्यक्ष सहवास , मार्गदर्शन व प्रेम तसेच निःस्वार्थी केलेली मदत यांचा अनुभव तथा प्रत्यक्षदर्शींना आपल्या भावना कृतज्ञतापूर्वक मांडण्यांची ही अनुपम सुवर्ण संधी आहे. या अनोख्या स्पर्धेत सर्वांनी सहभागी व्हावे असे विनम्र आवाहन भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे करण्यात आले आहे.सर्वोत्कृष्ट लेख व कवितांना पुढील प्रमाणे बक्षिसे दिले जातील.
*सर्वोत्कृष्ट गौरवपर लेख व काव्य पुरस्कार*
प्रथम पुरस्कार : – ३१०० रुपये ( प्रायोजक – ह.भ.प.मनोहरजी खोंडे सर )
द्वितीय पुरस्कार : – २१०० रुपये ( प्रायोजक – सोपान भवरे सर )
तृतीय पुरस्कार : – ११०० रुपये ( प्रायोजक – डॉ.विजय बागुल सर )
उत्तेजनार्थ दोन पुरस्कार – ( प्रायोजक – महेश शिंपी सर ) प्रत्येकी ५०० रुपये
*सर्वोत्कृष्ट कविता पुरस्कार*
प्रथम पुरस्कार : – २१०० रुपये ( प्रायोजक – ज्योती राणे मॅडम )
द्वितीय पुरस्कार : – १५०० रुपये ( प्रायोजक – उषाताई सोनार मॅडम )
तृतीय पुरस्कार : – १००० रुपये ( प्रायोजक – सुदाम बडगुजर सर )
उत्तेजनार्थ दोन पुरस्कार ( प्रायोजक – अरुण वांद्रे सर ) प्रत्येकी ५०० रुपये
समस्त सन्माननीय पुरस्कारार्थींना वर्षाताई अहिरराव प्रायोजित आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
*स्पर्धेचे नियम व अटी*
१ ) स्पर्धा सर्वांसाठी निःशुल्क असून गौरवपर लेख व कविता बुधवार दि.१२ फेब्रुवारी २०२५ अखेर पाठवाव्यात. २ ) एका व्यक्तीला दोन्ही स्पर्धेत भाग घेता येईल परंतु एकाच विभागात बक्षीस देण्यात येईल.३ ) लेख व कवितांना शब्द मर्यादा नाही. ४ ) टपालाशिवाय लेख व कविता वर्ड आणि पीडीएफ दोन्ही फॉर्मेट मध्ये पाठविणे नियमाधीन आहे.वर्ड मधील मजकूर युनिकोड फॉन्ट मध्येच असावा.फॉन्ट साईज १२ – १३ दरम्यान वापरावी. पुढील मेलवर साहित्य पाठवावे. vijayslulhe1964@gmil.com
*गौरवलेख व कविता पाठविण्यासाठी पत्ता*
विजय सुपडू लुल्हे
( संस्थापक जिल्हा प्रमुख ,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी )
‘ वात्सल्यसिंधु ‘ निवास असावा नगर भाग – २ गट नं .१९३ भवानी माता मंदिरा जवळ , पिंप्राळा परिसर ता. जि .जळगाव जळगाव – पीन ४२५००२
भ्रमणध्वनी – ९९२३३ १५२११
स्पर्धेचा निकाल मराठी राजभाषा दिन बुधवार दि .२७ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहिर करण्यात येईल असे एका प्रसिद्धी पत्रकान्वये स्पर्धेचे मुख्य संयोजक मनोहर खोंडे सर , विजय लुल्हे , पत्रकार सोपान भवरे , वर्षाताई अहिरराव , अभियंता मिलींद काळे, आर्किटेक्ट प्रमोद महाजन, निवृत्त प्राचार्य राजू महाजन, प्रकाशक युवराज माळी (अथर्व प्रकाशन, जळगाव ) , गझलकारा आशा साळुंके मॅडम मार्गदर्शक शशिकांत हिंगोणेकर साहेब ( निवृत्त शिक्षण उपसंचालक प्राथमिक विभाग ), सिद्धार्थ नेतकर साहेब ( निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी ),अरुण वांद्रे सर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!