अमळनेर येथील ज्ञानदा सायन्स क्लासेस मध्ये स्नेहसंमेलन व निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन*

0

अमळनेर  Express news
*अमळनेर*: अमळनेर येथील धिरज पवार सरांचा ज्ञानदा सायन्स क्लासेस मध्ये इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने सुरू झाली तर समारोप राष्ट्रगीत व राज्य गीतने झाली. 26 जानेवारी निमित्त देशभक्तीपर कार्यक्रम व समाज उपयोगी संदेश देणारे नाटक, एकांकिका ,सांस्कृतिक सणाबद्दल माहिती देणारे गीत व शेतकऱ्याची व्यथा मांडणारे नाटक व देशासाठी बलिदान देणारे सैनिकांसाठी गीत व व्यसनमुक्तीसाठी पथनाट्य करण्यात आली. कार्यक्रम ‘श्रीहरी’ सभागृह अमळनेर येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ज्ञानदा क्लासचे संचालक प्रा.श्री.धिरज पवार सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदा क्लासच्या सहसंचालिका प्रा.सौ. स्वाती पवार या होत्या. स्नेहसंमेलनात सहभागी झालेल्या व क्लास च्या चाचणी पूर्व परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी क्लासमध्ये मिळालेले आयुष्यात उपयोगी पडणारे धडे व क्लास मधील आठवणी सांगितल्या. अध्यक्षीय भाषणात धिरज पवार सरांनी बोर्डाच्या परीक्षेची भीती कशी घालवायची व अभ्यासाच्या सोप्या पद्धती व करिअर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा पाटील व कु. रोशनी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. आयुषी सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाला क्लास च्या विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!