धनदाई महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना ( NSS.) शिबीर उत्साहात संपन्न”*
अमळनेर Express news
अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS)विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दिनांक 22 ते 28 जानेवारी 2025 दरम्यान मौजे- आटाळे ता. अमळनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक श्री.किशोर नेरकर यांच्या हस्तेहस्ते झाले. तर शिबिराचा समारोप विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. संदिप नेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. .
या शिबिरात एकूण 75 स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिराच्या उदघाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डी . डी . पाटील, खजिनदार शैलेंद्र पाटील, आटाळे गावच्या सरपंच रत्नाबाई पाटील, उपसरपंच सोनाली मिस्त्री, स्थानिक शाळेचे मुख्याध्यापक योगेश्वर पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सात दिवसाच्या कालावधीत शिबिरार्थी स्वयंसेवकांनी आटाळे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसराची स्वच्छता, झाडांना आळे करणे, परिसरातील झाडांना पाणी देणे, , नवीन झाडे लावण्यासाठी 40 खड्डे खोदणे, ग्रामस्वच्छता, गावातील हनुमान मंदिर, महादेव मंदिर स्वच्छता करणे यासारखी समाजोपयोगी कामे केली तसेच गावात जनजागृती रॅली काढली आणि विद्यार्थ्यांनी यातून पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव, मतदार जागृती याविषयी जनजागृती करण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले.

शारीरिक श्रमासोबत बौद्धिक विकास व्हावा म्हणून दररोज दुपारी ३ ते ५ दरम्यान बौद्धिक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा समारोप दि. २८ जानेवारी रोजी झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सिनेट सदस्य डॉ. संदिप नेरकर, धनदाई संस्थेच्या संचालिका डॉ. नयना पाटील, प्रा. निशा पाटील, सौ. रेखाताई पाटील, डॉ. प्रियांका पाटील हे तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील हे उपस्थित होते. या प्रसंगी शिबिरार्थींनी मनोगते व्यक्त करीत शिबिरात प्रत्यक्ष जीवनशिक्षण मिळाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. महादेव तोंडे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. संगीता चंद्राकर , प्रा. सागर सैंदाणे, राहुल पुकडे यांचा शिबीर शिस्तबद्ध पद्धतीने घेतल्याबद्दल आटाळे गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व रा. से. यो. स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

