साळवे इंग्रजी विद्यालयात एसएससी व एचएससी च्या विद्यार्थ्यांना निरोप*
अमळनेर Express news
*विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्याच्या, बुद्धिमत्तेच्या व परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करावे*- महेश अहिरराव सर
साळवे तालुका धरणगाव येथील साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महेश अहिरराव सर म्हणाले बालपणाच्या वयातच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वृद्धी होत असते. त्यांनी विविध कौशल्य आत्मसात करावी. बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून विविध क्षेत्र पादाक्रांत करावेत. यश नक्की मिळते. आईवडील आणि गुरुजनांवर प्रेम करा. बेगडी प्रेमापासून सावध रहा,असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन डॉक्टर शशिकांत नारखेडे हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले. ज्येष्ठ शिक्षक जी व्ही नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना बालपणीच्या वयातील आठवणी स्मरणात राहतात. योग्य अभ्यास करून आपली प्रगती साधावी असे सांगितले. प्रतिभा पाटील यांनी सांगितले की ह्या सुवर्ण काळात आपल्या आयुष्यात परिवर्तन करण्याची ताकद असते. मेहनत, जिद्द, चिकाटी व स्वअभ्यासाने प्रगती साधावी. असे म्हटले.
याप्रसंगी ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे व खजिनदार रमेशदादा बोरोले यांनीही विद्यार्थ्यांचे कौतक केले व शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री एस डी मोरे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी, स्वआरोग्य सांभाळणे आणि अभ्यासाचे नियोजन करणे, परीक्षेची भीती बाळगू नये असे सांगितले. अनेक विद्यार्थ्यांनी स्वयं स्वयंस्पूर्तीने शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल मनोगते व्यक्त केले. शालेय आठवणींचे गीते व कविता सादर केल्या. विद्यार्थी नवीन गणवेश व नटून थटून कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थ्याना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विद्यार्थिनी धनश्री अत्तरदे हिने केले व आभार प्रदर्शन प्राची पाटील या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहभाग होता.

