पुस्तक वाचून केला वाचन प्रेरणा दिवस साजरा !..

0

अमळनेर  Express news

वाचाल तर वाचाल – गोपाल महाजन ( ग्रंथपाल )

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचून वाचन प्रेरणा दिवस साजरा केला. प्रस्ताविक पी डी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, पुस्तकप्रेमी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पी डी पाटील यांनी पुस्तकांचे महत्त्व स्वागत पुस्तक वाचल्याने मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेल्या मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही हे उदाहरण दाखले दिले. ग्रंथ हे आपले गुरु असतात. खरा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला वाचावे लागेल. वाचाल तर वाचाल असे प्रतिपादन शाळेचे ग्रंथपाल गोपाल महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार एस एन कोळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!