मराठी लाईव्ह न्यूजचा सहावा वर्धापन दिन – ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ सोहळा, 26 ऑक्टोबर 2025 रोजी उत्साहात!”
अमळनेर Express news
मराठी लाईव्ह न्यूजच्या सातत्यपूर्ण सेवेला वाचकांचा पाठिंबा व प्रेम हा खरा आधार
अमळनेर प्रतिनिधी:
राज्यातील घडामोडींना यथायोग्य, अचूक व वेगवान प्रसिद्धी देणाऱ्या ISO मान्यताप्राप्त मराठी वेबपोर्टल “मराठी लाईव्ह न्यूज” या प्रतिष्ठित माध्यम संस्थेचा सहावा वर्धापन दिन व “सन्मान कर्तृत्वाचा 2025 – प्रेरणा पर्व” हा विशेष सन्मान सोहळा दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता अमळनेर येथील जुना टाऊन हॉल, साने गुरुजी वाचनालय समोर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
“आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळेच मराठी लाईव्ह न्यूज सातत्याने सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे,” असे संपादक ईश्वर महाजन यांनी सांगितले. “लाखो वाचकांची दिवसेंदिवस मिळणारी पसंती हीच आमच्या यशाची खरी कहाणी आहे,” असे ते म्हणाले. या गौरवशाली प्रवासाच्या स्मरणार्थ प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याचा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
कार्यक्रमाचे अध्यक्ष: प्रा. बी. एन. चौधरी (ज्येष्ठ पत्रकार, व्यंगचित्रकार, धरणगाव)
उद्घाटक: डॉ. डिगंबर महाले (अध्यक्ष, मंगळग्रह सेवा संस्था)
प्रमुख अतिथी: कपिल पवार (सहआयुक्त, आदिवासी विकास महामंडळ, नाशिक)
वासुदेव देसले (डी.वाय.एस.पी., नाशिक ग्रामीण),मार्गदर्शक व व्याख्याते: प्रा. डॉ. जयदीप पाटील (अध्यक्ष, नोबेल फाउंडेशन, जळगाव),सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. नाशिक: सुनील नंदवाडकर,वरिष्ठ प्रबंधक, युनियन बँक ऑफ इंडिया: मयूर पाटील,महात्मा फुले हायस्कूल हायस्कूल देवगाव अमळनेर: अध्यक्ष विलासराव पाटील,मराठी वाङ्मय मंडळ: अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी,सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र: संचालक विजयसिंह पवार आहेत.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ. वसुंधरा दशरथ लांडगे (विश्वस्त, खान्देश शिक्षण मंडळ) यांच्या ओजस्वी शैलीत होणार असून, या कार्यक्रमात अनेक क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येणार आहे.
🏆 “सन्मान कर्तृत्वाचा 2025” पुरस्कारार्थींची यादी:
1️⃣ डॉ. अविनाश रघूराज जोशी, अमळनेर – वैद्यकीय व साहित्य क्षेत्र
2️⃣ श्री. मयूर चंद्रकांत पाटील, वरिष्ठ प्रबंधक, युनियन बँक – सामाजिक क्षेत्र
3️⃣ प्रा. डॉ. विजय तुंटे, अमळनेर – शैक्षणिक क्षेत्र
4️⃣ सौ. अनुपमा रामेश्वर जाधव (डहाणू) – साहित्य क्षेत्र
5️⃣ डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी (ठाणे) – सामाजिक क्षेत्र
6️⃣ श्री. सुनील दयाराम महाजन, (स्वेच्छा निवृत्त हेड कॉन्स्टेबल) – सामाजिक क्षेत्र
7️⃣ श्री. दशरथ सोमा लांडगे व सौ. वसुंधरा दशरथ लांडगे – आदर्श माता-पिता
8️⃣ डॉ. प्रसाद अशोक पाटील, विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय चोपडा – वैद्यकीय क्षेत्र
9️⃣ सौ. शोभा रघुनाथ शिंदे – सामाजिक क्षेत्र
🔟 अँड. कौस्तुभ सुनील पाटील – युवा व सामाजिक क्षेत्र
11️⃣ अँड. सारांश धनंजय सोनार – युवा प्रेरणा
वरील सर्व सन्मानार्थींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व बुक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या प्रेरणादायी व गौरवशाली सोहळ्यास सर्व मित्रपरिवार, ज्येष्ठ मार्गदर्शक, पत्रकार, पुरस्कारार्थी बांधव-भगिनी तसेच नागरिकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी लाईव्ह न्यूजचे संपादक ईश्वर महाजन यांनी केले आहे.
“आपले स्नेह, आशीर्वाद आणि साथ हीच आमची खरी संपत्ती आहे…”

