महात्मा फुले हायस्कूल येथे माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी !…

0

अमळनेर Express news

जिजाऊ माँ साहेबांचे कार्य प्रेरणादायी : पी डी पाटील.

युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद : जे एस पवार

धरणगाव प्रतिनिधी :

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व्ही टी माळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जया सोनवणे, रोहन करोसिया, दिव्या भोई या विद्यार्थ्यांनी माँसाहेब जिजाऊ यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी आऊसाहेब जिजाऊंचे कर्तृत्व, नेतृत्व व मातृत्व याविषयी व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी महापुरुषांच्या कार्यावर चालण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही टी माळी तर आभार एच डी माळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!