प्रा.डॉ. राहुल निकम यांना राज्यस्तरीय पुरस्कार

0

अमळनेर Express news

भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील प्रा.डॉ. राहुल निकम यांना जळगाव येथे आयोजित समता शिक्षक परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभावती बावस्कर ताई स्मरणार्थ राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी समता शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डी. के.अहिरे होते. प्रमुख मान्यवर नासिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे होते. प्रमुख व्याख्याते ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, पत्रकार किरण सोनवणे, समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रा.डॉ. राहुल निकम राहुल निकम हे गेल्या अनेक वर्षापासून शिव,शाहू,फुले आंबेडकर यांची विचारधारा आणि भारतीय संविधानाची मूल्ये समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, प्रथितयश उद्योगपती आशिष गुजराथी, समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते प्रा. अशोक पवार, गौतम मोरे, अशोक बिऱ्हाडे, समता शिक्षक परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष (प. वि.) भैय्यासाहेब सोनवणे, अजय भामरे, बापूराव ठाकरे, सोपान भवरे, दयाराम पाटील, संजय पाटील, मिलिंद निकम यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!