जल्लोष संस्कृतीचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

अमळनेर  Express news

साळवे इंग्रजी विद्यालय व साने गुरुजी प्राथमिक सेमी इंग्रजी विद्यालय, साळवे.ता धरणगाव जि.जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “जल्लोष संस्कृतीचा” या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा धरणगावचे मॅनेजर श्री. चंद्रशेखर चौधरी व ग्राम सुधारणा मंडळाचे चेअरमन डॉ. गिरीश नारखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख अतिथी श्री. चंद्रशेखर चौधरी यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षण, व्यायाम व संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देत सुदृढ व जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले.

मुख्याध्यापक श्री. एस. डी. मोरे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे सांगून शिक्षणासोबत परिश्रम, आहार व व्यायाम आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीते, प्रबोधनात्मक नाट्यछटा, विविध गीतांवर सुंदर नृत्य सादर केले. कलाकारांना प्रोत्साहन म्हणून पालकांनी व शिक्षकांनी बक्षीस देऊन कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. रंजना नेहेते यांनी केले. सूत्रसंचालन श्री. व्ही. के. मोरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. जी. व्ही. नारखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी परिश्रम घेतल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!