होमी भाभा फाउंडेशन मुंबई द्वारा आयोजित रोबो क्वेस्ट परीक्षेत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या चार विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी घेत उपरोक्त स्पर्धेत राज्यस्तरावर निवड सर्वत्र अभिनंदन*
अमळनेर Express
शैक्षणिक क्षेत्रात व अंतराळ संशोधन कार्यामध्ये अग्रेसर असणारी संस्था होमी भाभा फाउंडेशन मुंबई याद्वारे रोबोट कार्यावर आधारित व विद्यार्थ्यांच्या सप्तगुणांना वाव देण्यासाठी रोबो क्वेस्ट परीक्षेचे आयोजन हे करण्यात येत असते. सदर परीक्षेचे आयोजन हे जळगाव येथे करण्यात आले होते. अनेक नामांकित रोबोट क्षेत्रामध्ये वेगळेपण जपणारे संशोधन वृत्तीचे कासवआस घेऊन ध्येयवादी दृष्टिकोन अंगीकृत असणारे विद्यार्थ्यांनी या उपरोक्त स्पर्धेत उत्स्फूर्त स्वरूपात आपला सहभाग नोंदविला होता. अतिशय चुरशीची आपल्या बौद्धिक कौशल्याची परीक्षा घेणारी व तसेच आपले चातुर्य परखणारी ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये शाळेचे गुणवंत विद्यार्थी
1) कुणाल रवींद्र कोळी प्रथम क्रमांक
2) सिद्धेश योगेश पाटील द्वितीय क्रमांक
3) कार्तिक मुकेश शिसोदे तृतीय क्रमांक
4 )कौस्तुभ मुकेश शिसोदे तृतीय क्रमांक
यांनी आपली बौद्धिक चुणक दाखवून व आपल्याला काहीतरी वेगळे ध्येय साध्य करून भारताला एक रोबोटिक क्षेत्रात नवी ओळख करून द्यावयाचे आहे याच अनुषंगाने त्यांनी अतिशय जिद्दीने या स्पर्धेद्वारे राज्यस्तरीय स्तरावर त्यांची निवड झाली असून सर्वच क्षेत्रातून त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव त्यांचा होत असून भावी आयुष्यासाठी त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा प्राप्त होत आहे. शाळेमधून चार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते ते चारही विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरले. या परीक्षेसाठी अनमोल सहकार्य मार्गदर्शन सर्वोतोपरी साह्य शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक श्री. जे.एस. देवरे पर्यवेक्षक महेश माळी पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, स्वाती माळी, व्ही.जी. बोरोले, व्ही एस अमृतकर, प्रशांत वंजारी, डिम्पल देसाई, श्रावण पाटील, अनंत बागल, समस्त शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.

