प्रतिभा जाधव यांना जिल्हास्तरीय समता परिषदेचा उपक्रमशील शिक्षिका म्हणून पुरस्कार

0

अमळनेर  Express news

जळगाव येथील अल्पबचत भवन या ठिकाणी महाराष्ट्र राज्य समता परिषद जळगाव यांच्या वतीने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार शिक्षकांना देण्यात आले. लोण अमळनेर येथील माध्यमिक शिक्षक प्रतिभा देवराम जाधव यांना समता परिषदेचा उपक्रमशील शिक्षिका म्हणून पुरस्कार देण्यात आला. प्रतिभा जाधव या साने गुरुजी पतपेढी अमळनेर यांच्या सदस्य आहेत. हिंदी विषयाच्या तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. सामाजिक कार्यामध्ये त्या भाग घेत असतात. हिंदी मंडळ अमळनेर या त्या सक्रिय आहेत. प्रतिभा जाधव ह्या मितभाषी व शांत, संयमी आहेत. त्यांचा महिला मंडळ मध्ये जनसंपर्क चांगला आहे. पुरस्काराच्या वेळी उत्तम कांबळे, शिक्षक आमदार किशोर दराडे, किरण सोनवणे, भरत शिरसाट, रणजीत सोनवणे, समता पण सभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डि.के. अहिरै यांच्या उपस्थिती त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्काराने विविध संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!