महात्मा फुले हायस्कूल येथे क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण !… बक्षिस मिळाल्यानंतर मुला – मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद अविस्मरणीय : ज्ञानेश्वर महाजन

0

अमळनेर Express news

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे ३ जानेवारी सावित्रीमाई जन्मोत्सवानिमित्त क्रीडास्पर्धाचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव नगरीच्या उपनगराध्यक्ष सुरेखा विजय महाजन, विजय धनलाल महाजन, शिवसेनेचे गटनेते विलास महाजन, नगरसेवक परमेश्वर महाजन, लक्ष्मण महाजन, हेमंत महाजन, पवन महाजन, जितेश राजेंद्र महाजन, तेजस महाजन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले व मेवाडरत्न महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ, महापुरुषांचे ग्रंथ व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
क्रीडा महोत्सवामधील विजयी स्पर्धकांना व विजयी संघाला ट्रॉफी व मेडल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक विलास भाऊ महाजन यांनी साऊंड सिस्टिम, परमेश्वर महाजन यांनी ट्रॉफी व मेडल, लक्ष्मण महाजन यांनी कॅरम बोर्ड, हेमंत महाजन यांनी २५ टी-शर्ट दिले. जितेश व तेजस राजेंद्र महाजन यांनी वडिलांच्या स्मरणार्थ १०० दप्तर भेट दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील, एच डी माळी, एस एन कोळी यांनी तर आभार व्ही टी माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!